उपलब्धी

   

महाराष्ट्राच्या सर्व ३५ जिल्हयामध्ये कार्यरत आणि ४६० कंत्राटांच्या माध्यमातुन जवळपास १०५०० माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना रोजगार

उपलब्ध करून दिला.

मुंबईत मालाड येथे प्रट्रोल पंम्पाचे संचालन.

 

दोन टोलनाक्यांवरील पथकर वसुली केंद्राचे संचालन.

सातारा येथे स्वंत:ची संपुर्ण संगणकीकृत "कारगिल ऑफसेट प्रिंटिंग प्रेस" कार्यरत आहे, जेथे सर्वप्रकारच्या छपाईची दर्जेदार कामे होतात.

महाराष्ट्र राज्यातील युवकांना सैनिक तथा पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण शिबीर केंद्र सातारा येथे यशस्वीरीत्या चालविण्यात येत

असून आतापर्यंत या केंद्रातुन ११९६८ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

माजी सैनिकांच्या पाल्यांना मेस्कोच्या सुरक्षासेवेमध्ये समाविष्ट केले जाते.

६४३६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सातारा, अहमदनगर आणि पुणे येथील संगणक प्रशिक्षण् केंद्रातून यशस्वरीत्या प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पर्जनवृष्टीतील पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) चे चार प्रकल्प पुर्ण केले आहेत.

मुला-मुलींचे वसतीगृहे, बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम तसेच दुरूस्तीची कामे मेस्कोच्या स्थापत्य बांधकाम विभागा तर्फे यशस्वीपणे करण्यात आली.